Place: दिल्ली | Date: 2026-03-17

दिल्ली येथील कार्यशाळेत जनसेवा प्रतिष्ठान संघटनेचा सहभाग; जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा निर्धार
नांदेड- दिल्ली येथे 'बालविवाह मुक्त भारत' उपक्रमांतर्गत कार्यशाळा घेण्यात आली होती. यात नांदेड जिल्ह्यातील जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान संस्थेने सहभाग नोंदविला होता. यावेळी देशात २०३० पर्यंत जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा निर्धार संघटनेच्या सदस्यांनी घेतला.
'बालविवाह मुक्त भारत' मोहीम देशात सर्वत्र राबविली जात आहे. गतवर्षी देशातील १७ राज्यांतील ३०० जिल्ह्यांमध्ये या अभियानांतर्गत १६१ संस्था कार्यरत होत्या. आता ही मोहीम २२ राज्यांमध्ये पोहचली आहे. यातील बहुतांश जिल्हे बालविवाहाचे उच्च दर असलेले जिल्हे म्हणून करण्यात आली आहे. मोहिमेचा मुख्य उद्देश बालविवाह रोखण्यावर असला तरी, ते मुलांची तस्करी आणि बालकांचे शोषण यासारख्या मुलांच्या सुरक्षितता आणि संरक्षणाशी संबंधित मुद्यांवरही काम करत आहे.
कार्यशाळेत जनसेवा प्रतिष्ठान संस्थेचे प्रशासकीय व वित्त व्यवस्थापक श्री. जगदीश राऊत म्हणाले की, बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या सर्व संस्था या समान ध्येयाने एकत्र आल्या आहेत, ही आम च्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बालविवाह रोखण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करत आहोत. तसेच जिल्ह्यात जनजागृती मोहिमेद्वारे आणि कायदेशीर हस्तक्षेपांद्वारे बालविवाह हा गुन्हा आहे, अशी जाणीव करून नागिराकंना करून देत आहोत असे त्यांनी सांगितले. बालविवाह मुक्त भारत मोहीम देशातून बालविवाह दूर करण्यासाठी राज्य सरकार
आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने कार्य करत आहे. कार्यशाळेत ठरवण्यात आलेल्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केले. बालविवाह मुक्त भारत मोहिमेचे निमंत्रक रवी कांत म्हणाले, समाजातील खोलवर रुजलेल्या सामाजिक दुष्प्रवृत्तीचे उच्चाटन करण्यासाठी अशा मोठ्या प्रमाणावर संयुक्त धोरणात्मक प्रयत्नांची गरज आहे. बालविवाहासारख्या आव्हानाला सामोरे जायचे असेल, तर त्यासाठी एक विचारपूर्वक धोरण राबविणे आवश्यक आहे. पंचायत प्रमुख आणि सरकारी कर्मचारी एकत्र काम करणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गाव बालविवाहमुक्त व्हावे, यासाठी प्रयत्न करू, भूवन रिभू यांच्या 'व्हेव चिड्रेन, हॅव चिड्रेल टिपिंग पॉइंट एंड चाइल्ड मॅरेज'मध्ये सूचविलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे ते म्हणाले.