News-Details

लोणी येथे बहुविशेषज्ञ आरोग्य शिबिराचे आयोजन – 334 रुग्णांची तपासणी

Place: लोणी, यवतमाळ | Date: 2026-01-17


यवतमाळ तालुक्यातील लोणी येथे दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी बहुविशेषज्ञ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान, यवतमाळ, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) तसेच ग्राम पंचायत लोणी यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन लोणी ग्राम पंचायतच्या सरपंच सौ. रेखा फुलसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार एकाच ठिकाणी विनामूल्य उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिरामध्ये एकूण 334 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 115 जेष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीनंतर 51 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.

शिबिरामध्ये COHORT व फॅमिली कार्ड वितरण करण्यात आले. त्यामध्ये एकूण 6 COHORT कार्ड आणि 30 फॅमिली कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आले. तसेच 23 रुग्णांना ईसीजी तपासणीचा लाभ देण्यात आला.

या आरोग्य शिबिरात बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, जनरल फिजिशियन, सर्जन, हाडांचे तज्ञ (ऑर्थोपेडिक), नेत्ररोग तज्ञ तसेच ईसीजी विभाग अशा विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना विनामूल्य औषधांचे वितरण करण्यात आले.

ग्राम पंचायत लोणी यांच्या वतीने वैद्यकीय कर्मचारी व स्वयंसेवकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शिबिर स्थळी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा व रुग्ण मार्गदर्शन यांचीही योग्य व्यवस्था करण्यात आली होती.

हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाची संपूर्ण वैद्यकीय टीम, लोणी ग्राम पंचायतच्या सरपंच सौ. रेखा फुलसिंग राठोड व श्री. फुलसिंग राठोड यांचे विशेष योगदान लाभले. स्वयंसेवक शांत कानंदे, अंगणवाडी सेविका वृषाली व भाग्यश्री तसेच मदतनीस यांनी शिबिरादरम्यान रुग्ण मार्गदर्शन व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.

जनसेवा प्रतिष्ठान, यवतमाळचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. सोनल फाळके, सहाय्यक व्यवस्थापक शेख शम्मी आणि तालुका समन्वयक जया सलुजा यांनी शिबिराच्या नियोजन, समन्वय व अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे आरोग्य शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले.